Addiction Support Group

उत्थान म्हणजे

उत्साह, उभारी, प्रयत्न करणे, उद्योग इत्यादी. उत्थान या पाली भाषेतील शब्दाचे असे अर्थ आहेत. त्यालाच जवळचा असणारा ’उत्थान’ हा शब्द मराठीत आपल्याला परिचित आहे. व्यसनमुक्तीसाठी उत्साह हा अत्यंत आवश्यक आहे किंबहुना व्यसनमुक्तीनंतर तोच उत्साह द्विगुणीत होतो, वाढतो. व्यसनमुक्तीसाठी मनाची उभारी आवश्यक असते, प्रयत्न, चिकाटी, दीर्घोयोग, संकल्प या गुणांची आवश्यकता असते. त्यामुळेच या प्रकल्पाला साजेसे, उचित असे ’उत्थान’ हे नामकरण करण्यात आले आहे. धम्मपदामध्ये अप्रमाद- वर्गामध्ये १-२ गाथा आढळतात
 • उत्थानवतो सतिमतो सुचिकम्मस्स निसम्मकारिनो! सज्जतस्सच धम्मजीविनो अप्पमत्तस्स यसोभिवडढति!!!
  याचा अर्थ "उत्साहवान (उद्योगी), स्मृतिमान, पवित्र कर्मे करणारा, विवेकाने आचरण करणारा, संयमाने आणि धर्मानुसार कर्तव्यकर्म करणारा असा जो अप्रमादी (जागरूक असणारा) त्याचे यश वृध्दिंगत होते".
 • उत्थानेनप्पमादेन सज्जमेन दमेनच! दींप कयिराथ मेघावी यं ओघो नाभिकीरति!!!
  उत्साहाने (उद्योगाने) जागरूकतेने (सावधानतेचे), संयमाने आणि दमाने शहाण्या माणसाने( आपल्या मनाचे असे) एक बेट बनवावे की ज्याल पूर (ओध) तोडून, विटवरून टाकणार नाही.

आमच्या विषयी

उत्थान प्रकल्प हा विशेष करुन व्यसनमुक्ती व व्यसनमुक्तीच्या मार्गावर असलेल्या व्यक्तींसाठी एक उपक्रम आहे. उत्थानद्वारे व्यसनमुक्तीच्या मार्गावरील व व्यसनमुक्त अशा व्यक्तींना समाजाच्या मुख्यप्रवाहात एकत्रित आणण्याच्या प्रयत्न करणे व त्यांना मदत आणि सहकार्य करण्याचे आमचे उद्दिष्ठ आहे. आमचे सगळे स्वयंसेवक आणि सहयोगी हे संवेदनशील व उत्साही आहेत. उत्थान हा आरोग्य.कॉम चा एक नाविन्यापुर्ण उपक्रम आहे ज्या द्वारे स्वास्थ्य सेवा देणारे व स्वास्थ्य सेवा घेणारे यांना जोडण्याकरिता हा मंच आहे. या बद्दल अधिक माहितीसाठी [येथे क्लिक करा].
आमचा विश्वास आहे कि आम्ही योग्य दिशेने वाटचाल करत आहोत आणि याची पावती म्हणजे आम्हाला NASSCOM फाउंडेशन यांना सामाजिक पुढाकारासाठी (ई-सपोर्ट ग्रुप) सन्मानित केले आहे व सर्वश्रेष्ठ ई-महितीसाठी ’मंथन पुरस्कारानी’ सन्मानित केले गेले आहे.

आमचे कार्य

 • गरजू लोकांना एकत्रित करून समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
 • सुधारणा व पुर्नवसन या क्षेत्रातील असलेल्या संस्थानशी व लोकांशी त्यांना जोडण्यात येईल. ’उत्थान’ द्वारे उपलब्ध सहायता व संभावनांचे स्पष्ट व सोप्यारित्या अवलोकनाची निर्मिती करणे.
 • आमचा असा विश्वास आहे की, व्यसनमुक्त व्यक्तींना समाजात मानाचे स्थान मिळवून देण्यासाठी आम्ही त्यांना सक्षम बनवू शकतो.
 • सदस्यांचा संपूर्ण व्यक्तीमत्व विकास हा हेतू साध्य करण्याकरिता त्यांना आवश्यक ते मार्गदर्शन देण्याची सुविधा जसे कौशल्य विकास व व्यवसायिक पुर्नवसन प्रशिक्षण केंद्रे, समुपदेशक, स्वमदत गट, सोशल नेटवर्कींग आणि संवेदनशील उद्योजक उपलब्ध करून देणे आहे.
 • आम्ही रोजगार निर्मिती करणा-या संस्थाना सामाजिक दायित्व पूर्ण करण्याची संधी उपलब्ध करून देणार आहोत.
 • रोजगाराच्या शोधात असलेल्या सदस्यांना काम करत शिकण्याची व त्याचबरोबर उत्पन्न मिळविण्याची उत्तम संधी उपलब्ध करून देऊ.
  प्रसार मध्यामचे म्हणणे वाचा

उत्थानच का?

 • विविध खाजगी संस्था जे पुनर्वसनच्या क्षेत्रात कार्यरत आहे आणि त्यांचे ध्येय एकच आहे, अशा सर्व संस्थांना एकत्र करुन त्यांची शक्ती वाढवणे. ह्या प्रकल्पाद्वारे एक मंच उपलब्ध होईल ज्यामुळे या सर्व संस्थांना एकत्रित येऊन कार्य करत येईल.
 • अशा अनेक संस्था आहेत ज्या औषध-उपचार क्षेत्रात कार्यरत आहे पण व्यसनमुक्ती नंतरची काळजी व व्यसनमुक्त व्यक्तींचे पुनर्वसन यासाठी फार कमी संस्था आहेत ज्यांच्यामुळे त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यास मदत करतात.
 • बेरोजगारीमुळे यशस्वीपणे समाजात येण्यासाठी बरेच अडथळ्यांना सामोरे जावे लागते. बेरोजगारीमुळे व्यक्ती व त्याच्या परिवाराला विविध आर्थिक व सामाजिक समस्यांना सामोरे जावे लागते. या व्यक्तींना ताण, नैराश्य, हताश्पणा, असहायपणा असे अनेक विकार होतात आणि मानसिक व शारीरिक अस्वस्थता येऊन व्यक्ती पुन्हा व्यसनग्रस्त होऊ शकतो.
 • व्यसनमुक्तीच्या मार्गावरील व व्यसनमुक्त व्यक्ती अशा लोकांशी बेरोजगारीचा एक कलंक जोडलेला असतो. रोजगारामुळे त्यांच्या सामाजिक स्थितीत सुधारणा होईल व त्यांचा आत्मसन्मान वाढेल.
 • आम्ही अशा व्यक्तींची बेरोजगारी कमी करण्याचा व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणुन,समाजात एकरुप करण्याचा व त्यांचा संपुर्ण व्यक्तिमत्व विकास करण्याचा प्रयत्न करु.

उद्योजक

अर्थपुर्ण पुर्नवसन ही एक कठीण व दिर्घ प्रक्रिया आहे. आमचा addiction support group या मार्गावरील व्यक्तींना महत्वपुर्ण माहिती प्रदान करतो.या व्यतीरिक्त आमचा आणखी एक अनुभाग आहे त्यामध्ये आपण नोंदणी करु शकतात व आपली माहिती आणि बायोडेटा देऊ शकतात. आम्ही संभावीत उद्योजकांनपर्यांत पोहोचु शकतो व व्यसनमुक्तीच्या मार्गावरील व व्यसनमुक्त व्यक्तींना रोजगार देण्याचा प्रयत्नासाठी संवेदनशील उद्योजकशी जोडु शकतो.

उत्थानद्वारे सदस्य विविध कौशल्य विकास व व्यवसायिक पुनर्वसन प्रशिक्षण केंद्र, यामध्ये सहभाग घेऊ शकतील व चांगल्या समुपदेशकांशी व वैद्यकीय तंज्ञाशी जोडता येईल.
सहभागी होण्याकरिता
 • ऑनलाईन नोंदणी: ऑनलाईन नोंदणी-अर्जा द्वारे नोंदणी करा [येथे क्लिक करा] आणि नोकरी शोधा.
 • ऑफलाईन नोंदणी: तुमच्या डॉक्टरला किंवा समुपदेशकाला नोंदणी करण्यास सांगावे.
आमच्या ऑफलाईन सुविधाचा उपयोग करावा. आम्ही यासाठी एक व्यक्ती नियुक्त करू जो नोकरी शोधण्याचे प्रक्रियेत समन्वयाचे कार्य करेल.

प्रशिक्षण व आधार देणारे

या मंचाद्वारे विविध रुची असलेले व विविध पार्श्वभूमी असलेल्या मोठया समुहाला प्रशिक्षण सुविधा देणा-यांपर्यंत जोडता येईल. आमचे विशेष उद्दिष्ठ कौशल्य विकास आणि व्यवसायिक पुनर्वसन प्रशिक्षणावर आहे. आमचे सदस्य बहुतांश करून समाजातले उपेक्षित लोक आहेत, ज्यांना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. प्रशिक्षणासोबत सदस्यांना एक व्यक्तिगत मार्गदर्शकांची गरज असते. या मध्ये आमच्या सलाहगारांचा समावेशही असेल व ऑनलाईन सहकार्य आणि सुसंवाद साधण्याची सुविधा देखील असेल.
सहभागी होण्याकरिता
 • उत्थानवर नोंद करण्याकरिता [येथे क्लिक करा] . सर्व होणा-या कार्यशाळा व प्रशिक्षणाची माहिती ’बातमी आणि घडामोडी’ यावर सुचित केली जाईल.
 • तुमच्या संस्थेच्या संकेतस्थळाला आमच्या ऑनलाईन नोंदणी अर्जाशी जोडू शकता जेणे करून सदस्य तुमच्या संकेतस्थळावर जाऊन तेथे नोंदणी करू शकतील.
 • आवश्यक असल्यास : अपंग व्यक्तींसाठी प्रशिक्षण उपक्रम घेऊ शकतात.

रोजगार शोधत आहात

कुशल व अकुशल अशा समर्पित श्रमिक वर्गाला सहज व योग्य मानधन देणा-या उद्योजकांशी जोडुन देऊ.
समाजाच्या प्रवाहात स्वत:ला समावुन घेण्याकरिता व पुन्हा दैनंदिन व्यवहाराला आत्मसात करण्याकरिता आमचे सदस्य उत्सुक आहेत.
उत्थान हे सदस्यांना या प्रक्रियेत योग्य मार्गदर्शन करेल आणि अपेक्षित कर्मचा-यांना उद्योजकांशी जोडुन देईल असा आमचा विश्वास आहे.
उत्थानद्वारे तुम्हाला वंचित गरजु लोकांना योग्य व्यावसायिक संधी देऊन समाजासाठी आपले योगदान करता येईल. या तुमच्या पुढाकारामुळे व सहकार्यामुळे एकाच व्यक्तिचे आयुष्य चांगले होणार नाही तर त्याचे संपुर्ण कुटुंब सुखी होईल.

सहभागी होण्याकरिता
तुमच्या संस्थाची व तुमच्या संस्थेत रिक्त असलेल्या जागांची माहिती आमच्या संकेतस्थळावर ऑनलाईन फॉर्म भरून नोंदणी करू शकतात [ येथे क्लिक करा].
ऑफलाईन नोंदणीसाठी आम्हाला संपर्क करा.

प्रसार माध्यम

 • ‘व्यसनमुक्तां’चेही होणार आता ‘उत्थान’द्वारे पुनर्वसन!
 • उत्थान प्रकल्पाचा शुभारंभ सोहळा
 • व्यसनमुक्त युवकांना रोजगाराचे 'उत्थान'
 • उत्थान प्रक्पांतर्गत तीस जणांना नोकरी
 • व्यसनमुक्तीच्या मार्गावरील तीसजणांना रोजगार उपलब्ध
  अधिक वाचा..